सासूच्या निधनाने सुनेच्या आत्महत्येचे रहस्य पोलीसांनी उलगडले…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील आपटेनगर इथे  सासूचा मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसून सुनेने आत्महत्या केल्य़ाची बातमी खोटी निघाली आहे. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस चौकशीत समोर आले आहे. मालती लोखंडे यांचा शनिवारी आजारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची सून शुभांगी लोखंडे हिने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. पण सासुच्या निधनाने सुनेला आनंद झाला होता. यामुळे तिच्या पतीने तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी शुभांगीचा पती संदीप लोखंडेला ताब्यात घेतले आहे.  

आपटेनगर येथे मालती लोखंडेंचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे मालतीबाईंची सून शुभांगी लोखंडेने आत्महत्या केल्याचे शुभांगीचा पती संदीपने पोलीसांना सांगितले होते. यावेळी जुना राजवाडा पोलीसांनी अधिक तपास करत संदीप लोखंडेला ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने या हत्येची कबुली दिली. यावेळी संदीपने आईच्या निधनाने शुंभागीला आनंद झाला होता. याच कारणावरुन तिचा पती संदीप लोखंडेने शुभांगीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे पोलीसांना सांगितले.

खरंतर नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. शुभांगी यांच्या जाण्याने त्यांची दोन्ही मुले आता पोरकी झाली आहेत. पण सासू-सुनेच्या वादात अशी हत्या होणे निश्चितच समाजासाठी भूषणावह नाही.

 

One thought on “सासूच्या निधनाने सुनेच्या आत्महत्येचे रहस्य पोलीसांनी उलगडले…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे