विद्यार्थ्यांना पालकांनी पाठबळ द्यावे : डॉ. पी.ए.अत्तार

कोतोली (प्रतिनिधी) :  विद्यार्थ्यांमधील कार्यक्षमता वाढवण्यासाठी पालकांनी त्यांना पाठबळ दिले पाहिजे. असे प्रतिपादन श्रीपतराव चौगुले आर्टस सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.पी.ए. अत्तार यांनी केले. ते (माळवाडी कोतोली, ता.पन्हाळा) येथे आयोजित पालक स्नेह मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ.अजय चौगुले होते.

डॉ. अत्तार म्हणाले,  नोकरीसाठी शहरी व ग्रामिण विद्यार्थी असा कोणताही भेदभाव असत नाही. कार्यक्षमतेच्या जोरावर संधी प्राप्त होते. पालकांनी आपल्या पाल्यामधील कर्तृत्व शोधण्याची जबाबदारी पार पाडावी. विद्यार्थ्यांनी कॉलेज वेबसाईट बघून फीड बँक दिला पाहीजे.

यावेळी भारती पाटील, प्रा.बी.एन.रावण, प्रा.ए.आर.महाजन, श्रीमती व्ही.एस.पाटील,प्रा. यु.एन.लाड, पी.डी  माने,प्रा.एस.एस.कांबळे उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram