लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी सोशल मिडियाचा योग्य वापर हवा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी आणि भारतीय लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी सोशल मिडीयाचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. कोणत्याही  प्रलोभनाला बळी न पडता सद्सदविवेकबुध्दीने प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी केले. ते आज (बुधवार) शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले,  देशामध्ये साधारण नऊशे दशलक्ष मतदार  निवडणुकांमध्ये मतदान करणार आहेत..  कोल्हापूर जिल्हयामध्ये साधारण बत्तीस लाख, पंचाहत्तर हजार मतदार आहेत. तर  तरूण वयोगटातल्या मतदारांमध्ये सहा लाख मतदार आहेत. सोशल मिडीयाचा वापर वाढला आहे.  देशामध्ये सहाशे दशलक्ष मोबाईल इंटरनेट वापरकर्ते आहेत. ते दिवसातील दोनशे मिनिटे सोशल मिडीयावर खर्च करीत असतात. या माध्यमांद्वारे कमी वेळेत फार मोठया समुहापर्यंत संदेश पोहचू शकतो. सोशल मिडीयाचा निवडणूकांमध्ये वापर करताना कोड ऑफ कंडक्टचा योग्य वापर प्रत्येकाने केला पाहिजे.

कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले की, वापरापेक्षा गैरवापराकडे सोशल मिडीयाचा जास्त प्रमाणात वापर होताना दिसत आहे. सोशल मिडीयाच्या वापराबाबत आचारसंहिता आलेली आहे. अशावेळी समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन करणे हे माध्यमांची कामे आहेत. सोशल मिडीयाच्या वापराबाबत तरूण पिढी आणि सर्वच स्तरांमध्ये संस्कार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. समाजामध्ये, देशामध्ये तेढ निर्माण होणार नाही याासाठी मेसेज फॉर्वर्ड करीत असताना नेहमी जागृक असले पाहिजे.

यावेळी विभागीय माहिती संचालक सतीश लळीत, आयटी तज्ज्ञ राजेंद्र पारिजात, सोलापूर विद्यापीठाचे डॉ.रविंद्र चिंचोळकर यांच्यासह विविध अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता अधिविभागप्रमुख डॉ.निशा पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहायक प्राध्यापक डॉ.शिवाजी जाधव यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram