जोतिबा यात्रा काळात आपत्ती टाळा : विजय पोवार

कोतोली (प्रतिनिधी) : जोतिबा डोंगर येथे सासनकाठी धारक, पुजारी, व्यापारी यांच्या बरोबर पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे यांनी जोतिबाच्या चैत्र यात्रेची नियोजन बैठक घेतली. यामध्ये खोबऱ्याच्या वाट्या, प्लॅस्टिक बंदी, सासनकाठी उंचीवर मर्यादा ठेवून यात्रा काळात होणारी आपत्ती टाळावी, अशी सुचना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव विजय पोवार यांनी आज (मंगळवार) केली.

जोतिबा येथील पोलिस स्टेशन सभागृह येथे सासन काठी धारकांची बैठक घेण्यात आली. यावेळी सासनकाठी धारकांना सासनकाठीची उंची व जाडी कमी करण्याची सुचना देण्यात आली . या बैठकीला कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर भागातून ७० ते ८० सासनकाठीधारक सहभागी झाले होते.

तर व्यापाऱ्यांनी खोबरे वाटी उधळ्ण्यावर बंदी केल्याने खोबरे वाटीचे तुकडे करुन त्यांची विक्री करावी, तसेच शासन मान्य प्लॅस्टिकचा वापर करून जास्तीत जास्त कापडी कागदी पिशवीचा वापर करण्याच्या सुचना केल्या. यावेळी पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे यांनी व्यापाऱ्यांना फायर प्रतिबंधक युनिट बसविण्याचे आदेश दिले. तसेच कोडोली पोलिस स्टेशनचे स.पो.नि. संजीव झाडे यांनी यात्रा काळात दर्शन रांगांच्या व्यवस्थेची माहिती दिली.

या बैठकीला मानाचे दहा गावकर, ग्रामस्थ, पुजारी, व्यापारी, सासन काठीधारक उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे