आर्किटेक्ट, इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रादेशिक योजना, कोल्हापूर महानगरपालिका ‘ड’ वर्ग नियमावली, पंचगंगा पूरनियंत्रण रेषा, कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्यामध्ये येत असलेल्या अडचणींबाबत आज (मंगळवार) कोल्हापुरातील सर्व तांत्रिक व सहयोगी संस्थांच्यावतीने आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूरच्या विकासामध्ये अडथळ्याच्या ठरणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घेण्याचे आवाहन या निवेदनामध्ये करण्यात आले आहे.

प्रादेशिक योजनांमधील मागण्यांमध्ये प्रादेशिक योजनातील प्रादेशिक उद्यान रेखांकनाचा फेरसर्वे करावा, गावठाण वाडी विस्तार, वाड्या वसाहती व मूळ गावठाणामध्ये समाविष्ट करण्यात यावे, प्रादेशिक योजनेमध्ये गुंठेवारी आदेश समाविष्ट करण्यात यावा. ड वर्ग विकास नियंत्रण नियमावलीतील संदिग्धता दूर करावी. आदी मागण्याचा समावेश आहे. ‘ड’ वर्ग नियमावली संदर्भात अवास्तव सुविधा क्षेत्र मागणी २ हेक्टरपर्यंत मर्यादित ठेवावी, मंजूर प्लॉटमधील उंच इमारती करिता साईट मर्जीनमध्ये पुढील रेखांकन मंजूरीप्रमाणे सवलत मिळावी, हद्दवाढ नसल्याने फ्लोटिंग एफएसआय लागू करावा मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.

पंचगंगेच्या विकासासठी विकास आराखडा मंजूरीपुर्वी विकास नियंत्रण नियमावली कोल्हापूरसाठी मर्यादित ठेवून जाहीर करावी, पूरनियंत्रण रेषा तंत्रशुद्ध पद्धतीवर फेर सर्वे करण्यात यावा, पंचगंगा नदी गाळ मुक्त करावी, पंचगंगा नदी पात्रावर झालेले अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे यांसारख्या मागण्या या निवेदनामध्ये केल्या आहेत. कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणमधील क्षेत्र विकास प्राधिकरण कामकाजाची अंमलबजावणी सुरु करावी, क्षेत्र विकास प्राधिकरण करिता तांत्रिक व अत्रांत्रिक पदांची त्वरित भरती करावी, क्षेत्र विकास प्राधिकरण विकास योजना करावी आदी मागण्या केल्या आहेत.

शासनाने या समस्यांकडे गांभीर्याने न पाहिल्यास यापुढील मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येणार आहे. व त्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर मे महिन्यामध्ये न्यायालयामार्फत दाद मागणार असल्याचा इशारा तांत्रिक व सहयोगी संस्थांच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी अजय कोरणे, राजेंद्र सावंत,विजय कोरणे, महेश यादव, पार्षद वायचळ, आमराजा निंबाळकर, अर्थमुव्हिंग मशनिरी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष, कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, हुपरी, इंजीनिअर्स अॅन्ड आर्किटेक्टस् असोसिएशनचे अध्यक्ष, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघाचे अध्यक्ष मदन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram