चंद्रकांत चषक : ‘पीटीएम’ची विजयी घौडदौड कायम

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शाहू स्टेडियमवर सुरु असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज (मंगळवार) झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ’अ’ संघाने फुलेवाडी संघाला ३-० ने  एकतर्फी मात करीत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. 

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांला एकही गोल करता आला नाही. पीटीएमला गोल करण्याच्या संधी फुलेवाडीच्या गोलकीपरने यशस्वी होऊ दिल्या नाहीत. तर दुसऱ्या हाफमध्ये ४२ व्या मिनिटाला पीटीएमच्या ओंकार जाधवने पहिला गोल केला. खेळाच्या ५८ व्या मिनिटाला मैदानातच फुलेवाडीच्या खेळाडूंबरोबर पीटीएमचा स्टार खेळाडू ऋषिकेश मेथे पाटीलची बाचाबाची झाली. पंचानी हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद वाढला नाही.

यानंतर मात्र पुढच्याच क्षणाला ऋषिकेशने २ रा गोल केल्यानंतर पीटीएमच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ६८ व्या मिनिटाला जोन्सनने ३ रा गोल केला. निर्धारित वेळेत फुलेवाडीच्या संघाला एकही गोल करता आला नाही. अखेर हा सामना पीटीएमने ३-० ने जिंकला. सामनावीर ‘पीटीएम’चा ओंकार जाधव ठरला. तर लढवय्या खेळाडूचा पुरस्कार फुलेवाडीच्या संकेत साळोखेला देण्यात आला.

उद्याचा सामना – शिवाजी तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार. वेळ – दु. ४.०० वा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे