कोल्हापूर (प्रतिनिधी) : काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला आणावयाच्या थेट पाणी योजनेचे काम पूर्णत्वाला आलेले आहे. या महिना अखेरीस या योजनेची चाचणी होईल. दरम्यान; विरोधकांनी या कामांमध्ये खोडा घातला नाही, तर येत्या दिवाळीला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनच्या पाण्याने कोल्हापूरवासीयांचे अभ्यंगस्नान होईल, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरातील शिवाजी पेठेत एक कोटी ८० लाखांच्या व यादवनगरमध्ये ४० लाख निधीच्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

शिवाजी पेठेतील कार्यक्रमाला माजी महापौर आर. के. पवार, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, आदिल फरास, माजी विरोधी पक्षनेता अजित राऊत, मारुतीराव पाटील, विनायक फाळके, सचिन पाटील, परिक्षीत पन्हाळकर, रामचंद्र भाले, प्रभाकर नरके, सुरेश पाटील, राजू जाधव, प्रकाश दुकांडे, श्रीकांत यादव, डॉ. प्रदीप राऊत, अब्दुल सत्तार मुल्ला, राजाराम गायकवाड, एकनाथ शिंदे, मोहसीन मुल्ला, सागर गायकवाड, आयुब शेख, इर्शाद बागवान, लहू यादव, स्वप्नील गायकवाड, गब्बर मुल्ला, मंगेश मुजावर, शर्फुद्दिन शेख आदी प्रमुख उपस्थित होते.