गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील भडगाव येथे जि.प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा पायाभरणी सोहळा झाला. २०१३ च्या बृहत आराखड्यात याला मंजुरी मिळूनही केवळ जागेअभावी हे काम गेल्या १० वर्षांपासून रखडले होते.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य केंद्रासाठी गायरानमधील जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे या कामाला गती येऊन मंजूर झालेल्या ५ कोटी ९२ लाख रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात १ कोटी २० लाखांचा निधी उपलब्ध झाला आणि या इमारतीची पायाभरणी झाली. या आरोग्य केंद्राचा लाभ भडगावसह हुनगिनहाळ, जरळी, शिंदेवाडी, खमलेट्टी आदी गावांतील हजारो ग्रामस्थांना होणार आहे. जि.प.च्या माजी सदस्या राणी खमलेट्टी, पं. स. च्या माजी सदस्या श्रीया कोणकेरी, अन्य लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले.

पायाभरणी सोहळ्यात खमलेट्टी, कोणकेरी यांच्यासह सरपंच बसवराज हिरेमठ, रामाप्पा करीगार, बाबूराव पाटील, नितीन पाटील, भीमराव पट्टणकुडी, रवींद्र शेंडुरे, सुरेश देसाई, दयानंद पट्टणकुडी, विकी कोणकेरी, आप्पासाहेब बंदी, लक्ष्मण करगुप्पी, बाळासाहेब कोटगी, सचिन विभूते, बाळासाहेब पाटील, आप्पासाहेब माने, काशीनाथ कोरी, बसाप्पा राजमाने, ग्रामविकास अधिकारी राजाराम घेवडे आदी उपस्थित होते. विजयकुमार खमलेट्टी यांनी स्वागत केले, राजू कुरळे यांनी आभार मानले.