‘२६/११’चे तपास अधिकारी अब्दुलरऊफ शेख यांना बिसनेस एक्सप्रेसचा पुरस्कार !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील अकबर मोहल्ला परिसरातल रहिवाशी आणि २६/११ च्या मुंबई प्रकरणातील तपास अधिकारी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अब्दुलरऊफ शेख यांना सांगलीच्या बिसनेस एक्सप्रेसचा मानाचा ‘श्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती श्री फौंडेशनचे प्रमुख राजूभाई आत्तार यांनी ही माहिती दिली.

कॉमर्स कॉलेज कोल्हापूरचे अब्दूलरऊफ शेख माजी विद्यार्थी आहेत. १९८३ साली त्यांची सेंट्रल एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली. १९८५ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असताना झालेल्या २६/११ च्या प्रकरणातील आरोपींची तपासणी शेख यांच्यावर सोपवण्यात आली होती. तसेच पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासाठी त्यांना बेस्ट डिटेक्शन आणि बेस्ट कनव्हीनशन सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. २०१६ ला त्यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या गृह विभागाने त्यांची पोलीस तक्रार प्राधिकरणचे तपास अधिकारी म्हणून परत नियुक्ती केली.

त्यांच्या जिगरबाज कार्याची दखल घेत नामांकित ‘श्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले जात आहे. पुरस्काराचे वितरण १६ मार्च २०१९ रोजी  दुपारी ३ वाजता सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यमंदिर सभागृहात होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram