पुलवामा हल्ल्याचा कट रचलेल्या ‘जैश’च्या कमांडरसह तिघा दहशतवाद्यांचा खात्मा…

पुलवामा (वृत्तसंस्था) : मागील महिन्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या जैश-ए-महंमदच्या कमांडरसह तिघा दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. जिल्ह्यातील पिंगलिश गावामध्ये रविवारी सुरक्षा दल व दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यामध्ये जैश ए मोहम्मदचा जिल्हा प्रमुख, कमांडर मुदस्सर खान याच्यासह अन्य तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला.

यातील कमांडर मुदस्सर हा पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. आदिल अहमद दार व मुदस्सर खान यांनीच पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा कट आखला होता. इलेक्ट्रीशियन असलेल्या मुदस्सरने २०१७ साली जैश ए मोहम्मदमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून तो आदिल दारच्या संपर्कात होता.  सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी सज्जादच्या गाडीचा वापर करण्याचा सल्लाही  त्यानेच आदिल अहमद दारला दिला होता. हल्ल्यानंतर तो गायब झाला होता.  मात्र काही दिवसांपू्र्वी तो त्राल भागातील पिंगलिश भागात आल्याचे सुरक्षा दलाला कळाले. त्यानंतर जवानांनी रविवार या भागात शोध मोहिम सुरू केली. जवान आल्याचे कळताच येथील एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. जवानांनी त्यास चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी मुदस्सरसह तीन दहशतवादी ठार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram