लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांची पुण्यतिथी  विविध उपक्रमांनी साजरी…

मुरगूड (प्रतिनिधी) :  लोकनेते  स्व. सदाशिवराव मंडलिक यांचा चौथा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  शिवराज विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्या समाधीस्थळावर शहरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  अभिवादन करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या समाधीस्थळावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समाधी स्थळावरून प्रेरणा ज्योत कारखान्याकडे रवाना झाली.

दरम्यान, येथील  हुतात्मा तुकाराम वाचनालय आणि जेष्ठ   नागरिक संघाच्यावतीने वाचनालयात स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन  जी.व्ही. चौगले यांच्या हस्ते झाले.  यावेळी शिवराय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  गजानन गंगापूरे यांनी सदाशिवराव मंडलिक हे  पुरोगामी विचाराचे नेते होते.  निराधारांचे आधारवड होते. स्वच्छ चारित्र्य जपणारे स्वाभिमानी बाण्याचे लढावू व्यक्तिमत्व म्हणून अखंड महाराष्ट्राला  परिचित होते. नव्या पिढीने त्यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घ्यावी असे सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष राजे खान जमादार, नगराध्यक्ष नामदेव मेंडके, बिद्रीचे माजी संचालक बाजीराव गोधडे, नगरसेवक शिवाजीराव चौगुले, दिपक शिंदे,माजी नगरसेवक किरण गवाणकर यांच्यासह मान्यवर, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram