स्वच्छ सर्व्हेक्षणचा दिल्लीतला सन्मान हा वडगांव शहरवासियांचा : मोहनलाल माळी

पेठवडगांव (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये वडगाव शहराने भारतात अकरावे स्थान मिळविले. दिल्ली येथे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते नगराध्यक्ष मोहनलाल माळी, नगरसेवक, मुख्याधिकारी यांना पुरस्कार व सन्मानपत्र देण्यात आले. तर हा सन्मान वडगाव शहरवासियांचा आहे. या यशासाठी सहभागी सर्व नागरिकांचे आभार मानत असल्याचे मोहनलाल माळी यांनी सांगितले. ते आज (रविवार) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विविध निकषांमध्ये पालिकेने पटकावलेल्या क्रमांकाची माहिती नगराध्यक्ष माळी यांनी दिली.

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये वडगांव शहर दुसऱ्यांदा यशस्वी होऊन वडगाव शहराने भारतात अकरावे स्थान मिळविले असल्याची माहिती नगराध्यक्ष माळी यांनी दिली. या सर्व्हेक्षण स्पर्धेत भारतातील ४,२३७ शहरांनी सहभाग घेतला होता. त्या मध्ये वडगाव शहराचा संपूर्ण भारतात ११ वा तसेच झोनमध्येही ११ वा क्रमांक आला आहे. महाराष्ट्रात २५ हजार ते पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या शहरात वडगाव शहराचा पाचवा क्रमांक आला आहे. तर महाराष्ट्रातील ३४१ शहरामध्ये नववा क्रमांक वडगाव शहराचा आला आहे असे विविध क्रमांक वडगाव शहराने पटकावल्याचे नगराध्यक्ष माळी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष संतोष गाताडे, नगरसेवक कालिदास धनवडे, संतोष चव्हाण, संदीप पाटील, शरद पाटील, गौतम गोंजारे, नगरसेविका सुनिता पोळ, सावित्री घोटणे, मैमुन कवठेकर, शबनम मोमीन, नम्रता ताईगडे, सचिव प्रा.अविनाश तेली उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram