शिवरायांची विचारधारा आचरणात आणणे ही काळाची गरज : यशवंतराव थोरात

हमिदवाडा (प्रतिनिधी) : लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा आज (रविवार) चौथा स्मृतिदिन हमिदवाडा  कारखान्यावरील प्रेरणास्थळावर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते म्हणून यशवंतराव थोरात (माजी अध्यक्ष, नाबार्ड) हे होते. यावेळी त्यांनी मंडलिकाचे एकुणच व्यक्तीमत्व निर्भय व धाडसी होते. ते कुणालाच आयुष्यात घाबरले नाहीत.  प्रत्येक संकटाशी त्यानी सामोरे जाताना सदैव छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेउन वाटचाल केली. तेच शिवरायांचे विचार जोपासण्याची काळाची गरज बनली, असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय मंडलिक होते,

यावेळी यशवंतराव थोरात म्हणाले की,  मी व मंडलिक साहेब राजाराम  कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो. नंतर ते राजकारणात गेले व मी सरकारी  नोकरी  स्विकारली. तसेच मंडलिकांनी विचारांशी, तत्वाशी कधीच तडजोड केली नाही. आपण एखाद्या व्यक्तीची आठवण का जपतो, कारण त्या व्यक्तीपासुन आपल्याला काहीतरी प्रेरणा, स्फूर्ती मिळते. तसेच सदाशिवराव मंडलिक हे शिवरायांच्या विचाराने प्रेरीत होउन आयुष्यभर जगले आणि वावरले. त्याचपद्धतीने आज आपण सर्वांनी शिवरायांच्या विचाराने आणि त्यांच्या चारित्र्याने भारावुन जगले पाहीजे जसे  शहीद भगतसिंह जगले, असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य जीवन साळोखे यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांना श्रध्दांजली पर मौन पाळुन झाली. तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

यावेळी मंडलिक कारखानाचे उपाध्यक्ष, आजी माजी संचालक मंडळ,मुरगूडचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जि.प. सदस्य,  पं.स. उपसभापती, सदस्य आणि नागरीक उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram