चंद्रकांत फुटबॉल चषक : शिवाजी तरुण मंडळ, पीटीएम ‘अ’संघाचे एकतर्फी विजय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शाहू स्टेडियमवर सुरु असलेल्या चंद्रकांत चषक फॅुटबाल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळ आणि पीटीएम‘अ’ संघाने एकतर्फी विजय नोंदवले. संध्यामठ तरुण मंडळ विरुद्धचा सामना शिवाजी मंडळाने ४-१ ने जिंकला. तर ऋणमुक्तेश्वरला ६-० ने हरवत पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाने सामन्यावर एकतर्फी वर्चस्व गाजवले.

शिवाजीच्या मंडळ संघाच्या शुभम साळोखेने २२ व्या मिनिटाला गोल करून संघाला खाते उघडून दिले.  ३० व्या मिनिटाला सॅनो पॅट्सोने गोल करीत पहिल्या सत्रात संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात संध्यामठ मंडळाचा सिद्धेश साळोखेने ५६ व्या मिनिटाला गोल करून गोल फलकावर पहिला गोल लावला. त्यानंतर मात्र शिवाजीच्या आकाश भोसलेने संध्यामठला आघाडी घेऊ न देता ५७ आणि ७४ व्या मिनिटाला दोन गोल संघाला ४-१ ने विजय मिळवून दिला.

पीटीएम ‘अ’ संघाने या चषकातही ऋणमुक्तेश्वरविरुद्धच्या सामन्यात विजयी सलामी दिली. सामन्यावर पहिल्यापासून पकड ठेऊन १७ व्या मिनिटाला स्टार खेळाडू ऋषिकेश मेथे-पाटीलने सहज गोल केला. सौरभ सालपेने मागे न राहता १९ व्या मिनिटालाच दुसरा गोल झळकवला. ऋणमुक्तेश्वरच्या रविराज भोसलेने २२ व्या मिनिटाला गोल करण्याचा केलेला अप्रतिम प्रयत्न पीटीएमच्या गोलकीपरने  असफल केला. २४ व्या मिनिटाला ओंकार जाधवने गोलकीपरला चकवून गोल करीत गोलफलकावर पहिल्या सत्रातच ३ गोल लावले. ४० व्या मिनिटाला पीटीएमच्या ओंकार जाधवने गोल करण्याच्या २ संधी गमावल्या. मात्र ४२ व्या मिनिटाला रणजीत विचारेने ४ था गोल केला.  ६७ व्या मिनिटाला रुपेशच्या पासवर ऋषिकेशने ५ वा गोल नोंदवला. ७८ व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टीची संधी हुकली. मात्र ऋषिकेशने समयसूचकता दाखवत गोलकीपर पडल्याचे पाहून गोल नोंदवला. व पीटीएम ‘अ’ संघाने सामना ६-० ने जिंकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram