नरके फौंडेशनच्या विद्यार्थ्यांचे पीएसआय परिक्षेत घवघवीत यश…

कोल्हापूर (प्रतीनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये शहरातील नरके फौंडेशनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. फौंडेशनचा विद्यार्थी सुमित खोत हा सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम तर भटक्या विमुक्त जमाती ‘क’ गटातून आरती पिंगळेने राज्यात मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाने कोल्हापूरच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांची वेगवेळ्या पदावर निवड झाली आहे. यामध्ये शरद माने, सोमनाथ जाधव, प्रवीण यादव, इंद्रजीत चव्हाण, प्रमोद खाडे, राहुल पाटील, सूर्याजी पाटील, अमोल पाटील, दीपक पोवार, योगेश खैरावकर, दीपक माने, दयानंद पाटील, विनायक फराकटे, वैभव गाडे, ऐश्वर्या ऐताल, शृंखला पाटील, मनीषा कागलकर, सायली वारके, राजश्री पाटाळे, नीता शेलार, सविता धोत्रे, भाग्यश्री कांबळे यांनीही यश मिळवले आहे.

यावेळी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी नरके फौंडेशनने यशाची पाऊलवाट निर्माण केल्याची प्रतिक्रिया यशस्वी युवकांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण नरके, अध्यक्ष बाळ पाटणकर, उपाध्यक्ष चेतन नरके, ज्येष्ठ विश्वस्त उषेरॉय, दिलीप नरके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram