‘जमाते इस्लामी’चा आयएसआय, पाकिस्तानशी संबंध : गुप्तचर यंत्रणांचा खुलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारकडून नुकतीच बंदी घालण्यात आलेली ‘जमात ए इस्लामी’ या संघटनेचा जम्मू काश्मीर खोऱ्यातील तरूणांना देशविघातक कार्यात सक्रिय करणे, शस्त्रपुरवठा करण्यात हात असल्याचे गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केले आहे. संघटनेचे पाकिस्तान आणि ‘आयएसआय’शी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहे. याआधी देखील या संघटनेवर जम्मू आणि काश्मीर सरकारकडून आणि केंद्राकडून बंदी घालण्यात आली होती.

मेहबूबा मुक्ती यांनी या संघटनेवर बंदी घातल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जमात-ए-इस्लामी संघटनेचा पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सी आयएसआयशी संपर्क ठेवून आहे. ही संघटना पाकिस्तानच्या उच्चायोगासोबत सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून फुटीरवादी नेत्यांचा संपर्क वाढविण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. हुर्रियत कॉन्फरन्समध्ये जमात-ए-इस्लामी संघटनेचा प्रमुख सदस्य सय्यद अली शाह जिलानी कार्यरत आहे.

एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या संस्थेने पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय यांच्याशी संपर्क साधत आहे. जेणेकरून ते कश्मिरी तरुणांना शस्त्रे पुरविण्यासाठी हा संपर्क आहे. तरुणांना भडकविण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देणे आणि आर्थिक पुरवठा करणे शक्य होईल, त्यासाठी जमात ए इस्लामी काम करत असल्याचे पुढे आले आहे. त्याच्या नेत्याचे पाकिस्तानचे नवी दिल्लीस्थित उच्चायोगाशी संपर्क निर्माण झाले होते. त्यावरुन ही संघटना देशाविरोधी कारवाई करताना दिसत होती. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram