साळवण (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक बॅकेच्या निवडणूकीसाठी आज गगनबावडा येथे मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. चुरशीच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार ? याकडे जिल्ह्यातील शिक्षकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

तालुक्यात १४१ मतदारांपैकी १३७ सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक प्रकिया शांततेत पार पडली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून केद्रांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूकीची तयारी नियोजन पाहता तीनही पॅनेलकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.