कोल्हापूर (प्रतिनिधी) : विरोधकांच्या पाठीशी राजकिय शक्ती कार्यान्वीत झाली आहे. विरोधक खालच्या पातळीस जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करीत आहेत. त्यांच्याकडे बदनामी करण्याशिवाय हाती काय नाही. दादांनी ज्यांना ज्यांना मोठे केले आहे, तेच विरोधात वाटेल ते आरोप करीत आहेत. मात्र, दादा लाड हे आपल्या पतसंस्था रूपी कुटुंब प्रमुख म्हणून वडीलधारी व्यक्ती गेली १८ वर्षे सभासदांच्या उन्नतीचे कार्य करीत आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र कायम विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केले. ते इचलकरंजी येथे सभासद मेळाव्यात बोलत होते.

यावेळी कोजिमाशि पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने इचकरंजीमध्ये हा मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हातकणंगले तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पी. डी. शिंदे होते. तर स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीचे प्रमुख शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी इचलकरंजी शहर सभासद मेळाव्यात १८ वर्षातील सभासदाभिमुख सेवांचा आढावा घेऊन मेळाव्यास संबोधित केले.

खंडेराव जगदाळे म्हणाले की, दादा ही शक्ती आहे म्हणून राजकिय शक्तीच्या हाती सत्ता न देता मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ही कोजिमाशिची पतसंस्था आहे. ही निवडणूक यशस्वी करून स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीचे प्रमुख शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हाती सत्ता ठेवूया असे आवाहन जगदाळे यांनी केले.

संजय परीट म्हणाले, दादांनी मोठे केलेले विरोधात जाऊन तज्ज्ञ संचालक होण्यासाठी विरोधी भूमिका बजावत आहेत. ज्यांना शिक्षक आमदार होण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस केला ते विरोधकांना राजकिय शक्ती बनून मदत करीत आहेत. त्यांनी मीडिया समोर निवडणूकीत सहभागी नाही व मी कोणाच्याही बाजूला नाही असे जाहीर करावे. मतदाना दिवशी मतदान करतांना सभासदांना मोबाईल मतदान केंद्रावर नेण्यासाठी प्रतिबंध करावा अशी त्यांनी मागणी केली.

यावेळी चेअरमन बाळ डेळेकर, दत्ता पाटील, भाऊसाहेब आवळे, बी. जी. बोराडे, राजेंद्र रानमाळे, भिकाजी माने, सागर चुडाप्पा, दत्ता पाटील, डी. एस. घुगरे, अशोक हुबाळे, राजेंद्र रानमाळे, अशोक चव्हाण, प्रकाश चौगुले, विनायक सपाटे, हेमंत धनवडे, अशोक निंबाळकर, राजेंद्र कराळे, हेमंत धनवडे, इचलकरंजीतील सभासद उपस्थित होते.