पाकड्यांना चोख प्रत्युत्तर : ‘बीएसएफ’ने पाडले तिसरे ड्रोन

जयपूर (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती अद्याप थांबलेल्या नाहीत. राजस्थानमधील श्रीगंगानगर परिसरात आज आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेलं पाकिस्तान ड्रोन भारतीय लष्करानं पाडलं, अशी माहिती सैन्यदलाच्या सूत्रांनी दिली. 

राजस्थानमधील श्रीगंगानगरजवळ हिंदुमलकोट सीमेवर आज (शनिवार) पहाटे ५.४० वाजता पाकचे ड्रोन भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात होतं. मात्र, सतर्क सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ड्रोनवर गोळीबार सुरू केला. त्यामुळं ते ड्रोन पुन्हा पाकिस्तानात परतलं, अशी माहिती बीएसएफ अधिकाऱ्यानं दिली होती. त्यानंतर पुन्हा पाकिस्तानी ड्रोन श्रीगंगानगर परिसरात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात होतं. भारतीय लष्करानं ते ड्रोन पाडलं.

२६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत भारतीय लष्करानं पाकिस्तानचं तिसरं ड्रोन पाडलं आहे. पाच दिवसांपूर्वीच राजस्थानमधील बिकानेर येथील नाल सेक्टरमध्ये भारताच्या हद्दीत पाकिस्तानने ड्रोन घुसवण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय या विमानाने हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागून ते पाडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे