सासूच्या निधनाने व्यथित झालेल्या सुनेची आत्महत्या : कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सासुच्या निधनाने व्यथित झालेल्या सुनेने चक्क आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. कोल्हापूरमधील ही हृदयद्रावक घटना असून दोघींच्या मृत्युमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सासू आणि सुनेच्या प्रेमाची ही दुर्मिळ घटना आज घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोल्हापूरमध्ये शुभांगी लोखंडे यांचे प्रदीप लोखंडे यांच्याशी १६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना १५ वर्षाचा मुलगाही आहे. शुभांगी लोखंडे यांचे सासू-सासरे हे निवृत्त शिक्षक आहेत. शुभांगी लोखंडे यांचे आई वडील त्यांच्या लहानपणीच वारले होते. शुभांगी यांना तीन बहिणी होत्या. त्यातील दोन बहिणींचाही मृत्यू झाला होता. शुभांगी लोखंडे यांच्या सासू मालती लोखंडे यांनी आपल्या सुनेला मुलीप्रमाणे वागवले. दोघींमध्ये चांगला स्नेह होता.

गेल्या ८ दिवसांपासून मालती लोखंडे आजारी होत्या. शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले. शुभांगी यांना हा धक्का सहन झाला नाही. शुभांगी घाईघाईने दुसर्‍या मजल्यावर गेल्या आणि देवघरातील उदी घेऊन आल्या. ती उदी सासुबाईंना लावली आणि घरात फुंकली आणि सासुबाई येतील, असे म्हणत पुन्हा दुसर्‍या मजल्यावर गेल्या आणि तिथून खाली उडी मारून आत्महत्या केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. एकाच घरातील दोन स्त्रियांचा मृत्यू झाल्याने लोखंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram