‘नया पाकिस्तान है’ तर तशी कृती का नाही ? : इम्रान खानला परराष्ट्र खात्याचा टोला…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘ये नया पाकिस्तान है, हमारी सोच नयी है’, अशी परिस्थिती खरंच असेल तर ते त्यांच्या कृतीमधून का दिसत नाही, असा सवाल भारताने उपस्थित केला आहे. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेले अनेक दावे खोडून काढले.

‘ये नया पाकिस्तान है, हमारी सोच भी नयी है’, हा पाकिस्तानचा दावा खरा असेल तर त्यांनी आपल्या कृतीमधून ते दाखवून द्यायला हवे. त्यासाठी पाकिस्तानने दहशतवाद आणि सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीच्या विरोधात नव्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे, असे रवीश कुमार यांनी म्हटले. पाकिस्तानने भारताविरोधात एफ-१६ विमानाचा वापर करण्यात आल्याच्या दाव्याचेही ठामपणे समर्थन केले.

अनेकांनी ही विमाने पाहिली आहेत. तसेच एफ-१६ विमानांचे इलेक्ट्रॉनिक पुरावेही आमच्यापाशी असल्याचे रवीश यांनी म्हटले. भारताचे आणखी एक विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. पाकिस्तानकडे त्याचा व्हीडिओ असेल तर तो प्रसिद्ध का केला जात नाही, असा सवालही रवीश यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram