चंद्रकांत चषक : जुना बुधवार, फुलेवाडी संघांची विजयी सलामी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शाहू स्टेडीयमवर आज (शुक्रवार) चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. या सलामीच्या सामन्यात फुलेवाडी अन् जुना बुधवार या संघांनी विजयी सलामी दिली. मंगळवार पेठ विरुद्धच्या सामन्यात फुलेवाडीने ४-० ने एकतर्फी विजय मिळावला. तर गडहिंग्लज विरुद्ध च्या सामन्यात जुना बुधवारने ३-१ ने विजय संपादित केला.

फुलेवाडीच्या संकेत साळोखेने पहिल्या सत्रात २५ व्या मिनिटला आणि ४० व्या मिनिटला दोन गोल करून मंगळावर पेठेवर दबाव निर्माण केला. दुसऱ्या सत्रात मंगळावर पेठ दबावात खेळत असल्याचे पाहून फुलेवाडीच्या रियान यादगिरीने ६२ व्या मि. आणि ७० व्या मिनिटाला गोल करून संघाला ४-० च्या फरकाने विजय मिळवून दिला. मंगळवार पेठच्या निलेश खापरे, आकाश माळी यांनी चांगला खेळ केला.

जुना बुधवारने सामन्यावर पहिल्या मिनिटापासून वर्चस्व ठेवले होते. १ ल्या मिनिटला रोहन कांबळेने गोल करून संघाला आघाडी मिळून दिली. लगेच १४ व्या मिनिटला रोहननेच गोल करून संघाला पहिल्या सत्रातच विजयी आघाडी निश्चित केली. दुसऱ्या सत्रात ६८ व्या सुरज डबाळेने गोल करून गडहिंग्लजच्या आशा पल्लवित केल्या. जुना बुधवारची बचावफळी आणि गोलकीपरनी गडहिंग्लजची निराशा केली. अतिरिक्त मिळालेल्या वेळेचा फायदा करत ८०+ मिनिटाला जुना बुधवारच्या रोहन कांबळेने स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदवून संघाला ३-१ असा विजय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे