केंद्र सरकारचा कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा : औषधांच्या किमतीत भरघोस कपात

दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारने कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कॅन्सर प्रतिबंधक औषधांच्या किमतीत तब्बल ८७ टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. यामुळे देशातील हजारो कॅन्सरपीडितांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

देशभरात कॅन्सरपीडितांच्या संख्येत वाढ होत आहे. यावरील उपचारांसाठी येणारा खर्चही मोठा असतो. त्यातच औषधेही महाग असतात. देशात मध्यमवर्गीय आणि गरिबांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबाना उपचाराचा खर्च परवडत नाही. कित्येकदा अशा रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होतो. त्यामुळेच केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाने कॅन्सर प्रतिबंधक औषधांच्या किमतीमध्ये ८७ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे