चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेस शानदार प्रारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत फुटबॉल चषक स्पर्धेला आज (शुक्रवार) प्रारंभ झाला. या चषकाचा उद्घाटन सोहळा शाहू स्टेडीयम येथे कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते पार पडला. महिला दिनाच्या निम्मीताने उद्घाटन सोहळ्याचा मान महिलांना देण्यात आला. छत्रपती मधुरीमाराजे व महानगरपालिकेतील महिला नगरसेविका यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

८ ते २४ मार्च या कालावधीमध्ये चंद्रकांत चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूरमधील फुटबॉल खेळाच्या संस्कृतीला चालना मिळावी, कोल्हापूरमधून नविन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने चंद्रकांत चषकाचा प्रारंभ कारण्यात आल्याचे बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवासराव साळोखे यांनी सांगितले. यावेळी खा. धनंजय महाडिक, उद्योजक चंद्रकांत जाधव, नगरसेवक संभाजी जाधव, माजी महापौर हसीना फरासखान, नगरसेविका रुपाराणी निकम, यशोदा मोहिते, सविता घोरपडे आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे