मुंबईकरांना दिलासा : ५०० फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने मुंबईकरांना दिलासा दिला आहे. आज (शुक्रवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी  ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पालिकेने पाठिविला होता.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण अठरा निर्णय घेण्यात आले आहे. यात मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेने या संदर्भात मागणी केली होती. स्वयंपूनर्विकास धोरणाला मंजुरी देण्यात आली. रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमधील लाखो प्रकल्पबधितांना दिलासा सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जातींसाठीच्या १६५ निवासी शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर ‘एसआरए’मधल्या संक्रमण शिबिरातील घुसखोरांना दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत एकूण २८ लाख रहिवाशी घरे असून त्यापैकी १५ लाख घरे ही ५०० चौरस फुटापर्यंतची आहेत. या घरांना मालमत्ता कर माफ झाल्याने मुंबई महापालिकेच्या  दरवर्षाच्या ३४० कोटी रुपयांच्या उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे मुंबई पालिकेला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे