पालघर येथे स्फोटकांंनी भरलेल्या दोन व्हॅन जप्त…

पालघर (प्रतिनिधी) : पालघर येथे  स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चिल्हार फाटा येथे स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅन हस्तगत केल्या आहेत.  धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली त्या ठिकाणाहून २० किलोमीटरवर तारापूर अणुशक्ती केंद्र आहे. दोन व्हॅन भरून स्फोटकांचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

नुकतेच अहमदाबाद महामार्गावरील चांदीप आणि सायवन येथे वाळू माफियांच्या घरांवर आणि अड्ड्यावर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त केली.  १२३ जिलेटीनच्या कांड्या, ३४५  नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स आणि २१ सेफ्टी फ्यूजची बंडले जप्त करण्यात आली होती.  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हायअलर्ट जारी असताना स्फोटकांचा साठा पालघर पोलिसांच्या हाती लागला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा येथे स्फोटकांचा मोठा साठा येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅनसह त्यांच्या चालकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून दोन्ही चालकांची कसून चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे