महिला सक्षम तर घर सक्षम : रुपाली तावडे

टोप (प्रतिनिधी) : महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, यामुळे त्यांनी स्वत: काळजी घेतली पाहिजे. त्या स्वत: तंदुरुस्त असतील तरच घर चांगले आणि तंदुरुस्त होईल, असे मत टोपच्या सरपंच रुपाली तावडे केले. त्या जागतिक महिला दिनानिमित्त आज (शुक्रवार) टोप येथे आरोग्य शिबिरात बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी डी.आर. देवकाते होते.

यावेळी डॉ. रोहीणी मेवेकरी म्हणाल्या, सध्याच्या युगात महिलांनी वेळीच तपासणी करुन भविष्यात होणारे धोके टाळले पाहिजेत. ह्रदयरोग, मधुमेह कोरेस्ट्राँल, हायपर टेंन्शन यांची तपासणी करुन घेण्याची गरज आहे, जेणेकरुन मोठा धोका होण्याची शक्यता होणार नाही. महिलांनी आहार आणि आपली जीवनशैली सुधारली पाहिजे.

या शिबिरात ७० महिला तसेच पुरुषांनी तपासणी करुन घेतली. यावेळी ब्लडप्रेशर, हार्टरेट, ईसीजी, ब्लडशुगर, एसपीओ २ तपासण्यात आले.

यावेळी उपसरपंच विजय पाटील, विठ्ठल पाटील, बाळासो चव्हाण, लक्ष्मण पाटील, संग्राम लोहार, राजू कोळी, संपती कांबळे, धनश्री लुगडे, रोहीणी कांबळे, भानुदास पाटील, मेहजबीन मुजावर, प्रदिप पाटील, शितल कांबळे, स्वप्निल पोवार ग्रामस्थ उपस्थित होते.

 

One thought on “महिला सक्षम तर घर सक्षम : रुपाली तावडे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे