जम्मू हल्ला : अल्पवयीन मुलाने चक्क ‘टिफीन’मधून आणला ग्रेनेड…

जम्मू (वृत्तसंस्था) : जम्मूच्या मध्यवर्ती भागातील अत्यंत गजबजलेल्या बसस्थानकावर गुरुवारी ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी हिजबुल मुजाहिदीनच्या फारुख अहमद भट याला काही तासातच जेरबंद केले. धक्कादायक म्हणजे भट याच्या सांगण्यावरून नववीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलाने आपल्या टिफीनमधून ग्रेनेड आणला होता. डब्यात भाताखाली हा ग्रेनेड लपविण्यात आला होता. या मुलास हल्ला झाल्यानंतर एका तासातच पोलिसांनी पकडले, अशी माहिती जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी दिली.

गुप्तचर यंत्रणांनी जम्मू पोलिसांना गजबजलेल्या ठिकाणी एखाद्या अल्पवयीन मुलाच्या सहाय्याने हल्ला केला जाऊ शकतो असा अलर्ट दिला होता. यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तयारी केली होती. यामुळेच हल्ला झाल्यानंतर एका तासात या मुलाला पकडण्यात पोलिसांना यश आलं. उत्तर काश्मीरमधील कुलगाम येथील या अल्पवयीन मुलाला घरी जात असताना पोलिसांनी नागरोटा येथील चेक पॉईंटवरून ताब्यात घेतलं.

या मुलाने युट्यूबच्या सहाय्याने ग्रेनेड हल्ला कसा करायचा याचं प्रशिक्षण घेतलं होतं. मुलाची चौकशी केलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या मुलाने लंचबॉक्समध्ये ग्रेनेड लपवून ठेवला होता. डब्यात भाताखाली हा ग्रेनेड ठेवण्यात आला होता. मुलगा एका खासगी कारने जम्मूला आला होता. मात्र तो यापूर्वी कधीच जम्मूला आला नसल्याकारणाने त्याला येथे येण्यासाठी कोणी मदत केली याचा तपास करत आहोत असंही अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे