गुगलकडून खास डुडलद्वारे नारीशक्तीला मानवंदना..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  सर्च इंजिन गुगलनेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल बनवून नारीशक्तीला मानवंदना दिली आहे.  या डुडलमध्ये १३ भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत. 

गुगलने बनवलेल्या खास डुडलला क्लिक केल्यानंतर जगभरातील वेगवेगवळ्या भाषांमधील कोट्स दिसू लागतात. तसेच कोट्स देणाऱ्या महिलांचे नाव सुद्धा या ठिकाणी वाचता येतात. यात भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कॉमच्या नावाचाही समावेश आहे. मेरी कॉमने या कोट्समध्ये लिहिलेय की, ‘तुम्ही एक महिला आहात म्हणून तुम्ही स्वःताला कमकुवत समजू नका’. या डुडल स्लाइडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा पर्याय सुद्धा दिला आहे. या प्रेरणादायक कोट्समध्ये जगभरातील प्रतिभावंत महिलांचा एक समूह डिझाईन करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे