शाळेची इमारत देखणी नको तर शिक्षक चांगले हवेत : सरोजनीताई पाटील

कोतोली (प्रतिनिधी) :  सुंदर आणि निसर्गरम्य गावात आमच्या मामांनी आम्हाला आजोळी का आणले नाही. असे प्रतिपादन सरोजनीताई पाटील यांनी केले. त्या गोलिवडे (ता.पन्हाळा) येथील शारदाबाई पवार प्राथमिक शाळेच्या भूमिपूजनावेळी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर सुनिता मोरे होत्या.

यावेळी सरोजनीताई पाटील म्हणाल्या, आमच्या वडिलांनी आईला पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ती १९३२ साली पहिली महिला नगराध्यक्ष बनली. तेव्हापासून त्या राजकारणासह समाजकारणात सहभागी झाल्या. यामुळे आम्ही संस्कारशील बनलो. फक्त शाळा इमारत देखणी नको, तर येथे शिक्षण देणारे शिक्षक तळमळीचे असली पाहिजेत. तरच देशाला पुढे घेऊन जाणारे विद्यार्थी घडतील, असेही त्यांनी सांगितले.

महापौर सुनिता मोरे म्हणाल्या, खा. शरद पवार यांनी आजोळच्या शाळेसाठी सव्वा कोटींचा निधी देऊन शैक्षणिक काम भक्कम केले. यामुळे येथील मुलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मिटला असल्याचे महापौर मोरे यांनी सांगितले.

विजया पाटील म्हणाल्या, महिला दिनानिमित्ताने येथील महिलांना मोकळीक द्यावी, त्यांचा आदर करावा. या महिला देशाच्या जडणघडणीत पुढे असतील. मुलांना अभ्यासाबरोबर  खेळायला वाव दिला तरच तो योग्य नागरिक घडेल, असे मत विजया पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर.के.पवार यांच्यासहीत ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे