जम्मू बसस्थानक हल्ल्यामागे हिजबुल मुजाहिदीन : हल्लेखोर काही तासांतच जेरबंद…

जम्मू (वृत्तसंस्था) : जम्मूत आज (गुरुवार) सकाळी जो ग्रेनेड हल्ला करण्यात आला त्यामागे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती पोलीस महासंचालक मनिष सिन्हा यांनी दिली आहे. हिजबुलचा दहशतवादी फारूख अहमद भट उर्फ ओमर याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गु्न्ह्याची कबुली दिली आहे अशी माहिती सिन्हा यांनी दिली.

तत्पूर्वी जम्मूमधील बसस्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली होती. मात्र त्यांनी हल्लेखोराचे नाव उघड केले नव्हते. घटना घडल्यानंतर काही तासातच पोलिसांनी ही कारवाई केली. 

आज सकाळी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता.  तर २७ जण जखमी झाले आहेत. ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी १५ संशयितांना ताब्यात घेतलं होतं.  या हल्ल्यामागे दहशतवादी संघटना असल्याचा हात संशय व्यक्त केला होता, तो खरा ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram