कौलगेतील प्रा. अश्विनी पाटील यांना नांदेड विद्यापीठाचे सुवर्णपदक…

कोतोली (प्रतिनिधी) : आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, सांगली महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून सौ. अश्विनी पाटील कार्यरत आहेत. त्यांनी नांदेड विद्यापीठाची सन २०१८ मध्ये एम.फार्म ची पदव्युतर परिक्षा दिली होती. त्यामध्ये सर्वाधिक ९५.३० टकके इतके गुणसंपादन केले होते. त्यासाठी अश्विनी पाटील यांचा नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुवर्णपदकाने सन्मानित केले.

यावेळी बेंगलूर येथील भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था (इस्त्रो) चे माजी अध्यक्षप द्मविभूषण डॅा. के. कस्तुरीरंगन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. तर विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. उध्दव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिक्षांत समारंभात अश्वीनी पाटील यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.

अश्विनी पाटील या कौलगे (ता. तासगांव, जि. सांगली) येथील आहेत. नांदेड विद्यापीठाच्या सन २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या एम फार्म या पदव्युतर परिक्षा आश्विनी पाटील यांनी दिली होती. त्यामध्ये सर्वाधिक ९५.३० टकके इतके गुणसंपादन केले होते. त्यामुळे त्या विद्यापीठात सर्वप्रथम आल्यामुळे रामानंदतीर्थ विद्यापीठ सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram