लवकरच २० रुपयांचे नाणे चलनात… : अधिसूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं  २० रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं या संदर्भात एक अधिसूचना काढली आहे. वीस रुपयांच्या नाण्यासोबतच सरकार १, २, ५ आणि १० रुपयांची नवी नाणीही आणणार आहे.

नव्या नाण्याच्या बाहेरील बाजूस ६५ टक्के तांबे, १५ टक्के झिंक, २० टक्के निकेल असेल तर, आतील बाजूस ७५ टक्के तांबे, २० टक्के झिंक आणि ५ टक्के निकेल असेल. हे नाणं २७ मिलिमीटर व्यासाचं व ८.५४ ग्रॅम वजनाचं असेल. या नाण्याला १२ कडा असतील. नाण्याच्या एका बाजूस अशोक स्तंभाचे चिन्ह व त्याखाली ‘सत्यमेव जयते’ लिहिलेलं असेल. उजव्या बाजूस भारत व डाव्या बाजूस INDIA लिहिलेलं असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूस नाण्याचं २० रुपये हे मूल्य कोरलेलं असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे