नोकरदार, कामगारांना खुशखबर : ग्रॅच्युईटीवर मोठी सवलत लागू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोकरदारांना, कामगारांना २० लाखांपर्यंत मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीवर आता कोणताही कर आकारला जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. २०१८-१९ मध्ये निवृत्त होणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली आहे. 

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न आता करमुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे स्टॅंडर्ड डिडक्शनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. यावर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही दिलासा देण्यात आला आहे. आतापर्यंत १० लाखांपर्यंत मिळणारी ग्रॅच्युईटी करमुक्त होती. हीच मर्यादा आता २० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात २०१८ मध्येच सूचना काढण्यात आली होती. तसंच जूनमध्ये सादर होणाऱ्या नव्या सरकारच्या अर्थसंकल्पातही अजून काही महत्त्वपूर्ण बदल होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. सरकारने २० लाखांपर्यंतची ग्रॅच्युईटी करमुक्त असल्याचे जाहीर केले असले, तरी या निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात येईल हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram