कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर राष्ट्रीय पातळीवरील फॉरेन्सिक या क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्यांसाठी ऑल इंडिया फॉरेन्सिक सायन्स एन्ट्रान्स टेस्ट ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये चाटे अकॅडमीच्या कु. स्नेहल आरदेशना, कल्याणी वळीव, सुरज पाटील, हर्षदा पाटील आणि निखील बिडकर या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या पारंपारिक असणाऱ्या या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. या स्पर्धा परीक्षेतील यशावर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची संधी विद्यार्थ्याना नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी केले.

डॉ. खराटे म्हणाले की, चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांनी दहावी बारावीसोबत एआयएफएसईटी परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवून चाटे पॅटर्न राष्ट्रीय पातळीवरील सर्व उपयुक्त आहे. या स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना तीन वर्षांची पदवी आणि दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण येता येते. यानंतर विद्यार्थ्यांना फॉरेन्सिक सायन्स संबंधीत विविध संस्था आणि न्याय वैधक शास्त्रातील क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. अशाप्रकारच्या विविध परीक्षांसाठी अपेक्षित असलेला अभ्यासक्रम चाटे पॅटर्नमध्ये पूर्ण करुन घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचे सांगितले.

यावेळी शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे, संचालक प्रा. डॉ. भारत खराटे आणि पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक आणि प्राचार्य प्रशांत देसाई यांचे अभिनंदन केले.