दोन दुचाकींच्या धडकेत नंदगावचा तरुण जागीच ठार…

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : गिरगाव – द. वडगाव (ता. करवीर) मार्गावर गुरुकुल विद्यालयाशेजारी असणाऱ्या धोकादायक वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले. संतोष नामदेव शिंदे (वय ४०, रा. नंदगाव, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव असून हा अपघात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.

इस्पुर्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हा आपल्या मित्रासोबत दुचाकी (एमएच ०९ डी इ ७८४३) नंदगावकडे येत होता तर केर्लीतील केरलीतील दोन तरुण नवीन दुचाकीवरून कोल्हापूरकडे जात होते. गिरगाव – द. वडगाव (ता. करवीर) मार्गावर गुरुकुल विद्यालयाशेजारी असणाऱ्या धोकादायक वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की संतोषच्या दुचाकीचे चाक दुसऱ्या दुचाकीसोबत तुटून गेले. धडकेत संतोष रस्त्यावर जोराने आपटल्याने डोक्याला जोराचा मार लागला व रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीवरील दोघे व संतोषचा मित्र हे तिघेही जखमी झाले आहेत. काही तरुणांनी तत्काळ ॲम्बुलन्सला बोलावून जखमींना उपचारासाठी सीपीआरकडे हलविले. काही वेळात इस्पुरली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संतोष शिंदे हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram