जम्मू बस स्थानकावर दहशतवादी हल्ला : एकाचा मृत्यू

जम्मू (वृत्तसंस्था) : पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू येथे आज (गुरुवार) पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास जम्मू बस स्थानकावर हँडग्रेनेड फेकण्यात आला.  यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या प्रकाराने प्रवाशांत घबराट पसरली. तर सुरक्षा दलांची धावपळ उडाली. या घटनेनंतर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एका व्यक्तीने बसमध्ये ग्रेनेड फेकल्यामुळे हा स्फोट झाला. हा परिसर रिकामा करण्यात आला असून सध्या पोलिसांचे पथक घटनास्थळी तपास करत आहे. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे जम्मू-काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे