संतापजनक : मेहबूबा मुफ्तींची फुटीरतावादाला प्रोत्साहन देणारी कृती…

श्रीनगर (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या काश्मीरातील जमात ए इस्लामी संघटनेचा मेहबुबा मुफ्ती यांना भलताच पुळका आला आहे. संघटनेवरील बंदी उठवण्यासाठी मेहबुबा मुफ्त यांनी आज (बुधवार) अनंतनागमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह निदर्शने केली. त्यांच्या या कृतीने संताप व्यक्त होत आहे.

दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून जमात-ए-इस्लामी या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यावर माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती सईद यांना संघटनेचा पुळका आला आहे. ही बंदी उठवावी यासाठी मेहबूबा यांनी अनंतनागमध्ये निदर्शनं केली. बंदी तातडीने उठवावी, अशी मागणी सईद यांनी केली आहे.  त्यांच्या या कृतीने संताप व्यक्त होत असून या कृतीचा भाजपने निषेध केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे