अमेरिकेकडून भारताला दिलेला ‘जीएसपी’ दर्जा रद्द…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापाराच्या बाबतीत भारताला दिलेला विशेष प्राधान्य (जीएसपी) चा दर्जा काढून घेण्याचा निर्णय अमेरिकेतील ट्रम्प सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळं भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या काही वस्तूंवरील करसवलती रद्द होणार असून भारताला प्रतिवर्षी सुमारे २० कोटींचा फटका बसणार आहे. अमेरिकी सिनेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ही घोषणा केली.

जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेस (जीएसपी) च्या अंतर्गत भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या सुमारे ४०० अब्ज किंमतीच्या वस्तूंवर अमेरिकेत आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. त्यामुळं भारताला १९ ते २० कोटींचा फायदा होत होता.

मात्र, अमेरिकेनं जीएसपी दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळं भारताला आता हा फायदा मिळणार नाही. भारतीय बाजारात अमेरिकेला योग्य व्यापारसंधी मिळवून देण्याची हमी भारताकडून मिळत नसल्यानं हा निर्णय घेत असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे