विश्वचषकात भारताला पाकिस्तानसोबत खेळावेच लागणार, अन्यथा… : आयसीसी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी विश्वचषकात भारताला पाकिस्तानसोबत खेळावेच लागणार. जर भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला तर पाकिस्तानला संपूर्ण गुण दिले जातील. भारताला एकही गुण दिला जाणार नाही, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले. पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला थारा देत असतो. त्यामुळे पाकिस्तान संघाविरोधात क्रिकेट लढती स्थगित करण्यात याव्यात, अशी बीसीसीआयने मागणी केली होती. ही मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फेटाळून लावली आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सैनिकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. यासाठी पाकिस्तान पूर्ण जबाबदार आहे, अशी बाजू बीसीसीआयने मांडली होती. यासाठी ‘बीसीसीआय’ने आयसीसीला पत्र पाठवून दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तान विरोधातील क्रिकेट सामन्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळली आहे.

‘या प्रकरणांमध्ये भूमिका घेणे हे आयसीसीचे कार्य नाही. या संदर्भातील निर्णय सरकारी स्तरावर घेतला जाऊ शकतो. परंतु आयसीसीकडे याबाबत कोणतीही नियमावली नाही’ असे आयसीसीआयने स्पष्ट केले आहे. विश्वचषकातील सामन्यांच्या नियोजितवेळापत्रकानुसार हा सामना १६ जून रोजी होणार आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram