अटल चषक : प्रदर्शनीय सामन्यात राजाराम वॉरियर्सची शाहू रॉयल्सवर मात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शाहू स्टेडीयमवर सुरु असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धत आज (शनिवार) मान्यवर नेते, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यात प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात राजाराम वॉरियर्सने ४-२ने शाहू रॉयल्सवर विजय मिळवला.

शाहू रॉयल्स संघामध्ये शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव,  राष्ट्रवादीचे जयकुमार शिंदे,  पंच सुनील पोवार, आदि मान्यवर खेळत होते. नगरसेवक विजय खाडे, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे,  प्रसाद जाधव, किसन कल्याणकर, शिवाजी पाटील, उद्योजक चंद्रकांत जाधव आदी राजाराम वॉरियर्सकडून खेळले. यात

राजाराम वॉरियर्सकडून संग्राम शिंदेने २ गोल नोंदवले. तर शाहू वॉरियर्सकडून मयुरेश कदम यांनी दोन गोलची नोंद केली. त्यामुळे सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लागला. यात राजाराम वॉरियर्सने शाहू रॉयल्सचा ४-२ असा पराभव केला. शाहू कडून अमर सासने, महेश जाधव यांना गोल करता आले. समाजातील या मान्यवर व्यक्तींचा खेळ शाहू स्टेडियमवरील प्रेक्षकांच्यात मजेशीर चर्चा चालू होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे