मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’  मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांच्यासोबत सध्या ४० च्या वर आमदारांची संख्या आहे. हे सगळे सुरु असताना ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदेंचे प्रयत्न आहेत, अशी माहिती आहे. यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याची देखील माहिती आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्र सादर केल्यानंतर शिंदे सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे गटाला ३८ शिवसेना आमदार आणि ७ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. आज राज्यपालांना पत्र पाठवून मविआकडे संख्याबळ नसल्याचा दावा करण्याची शक्यता आहे, तर १०  खासदारांचा पाठिंबा असल्याचीही माहिती आहे.