आहारातील शिस्त सांभाळल्यास रोगांवर मात शक्य : डॉ. जगन्नाथ दीक्षित

गारगोटी (प्रतिनिधी) : प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करून आहारातील शिस्त सांभाळल्यास मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांवर मात करता येते. प्रत्येकाने आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, या उद्देशाने अरुण डोंगळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हे कार्य समाजाच्या हिताचे आहे, असे प्रतिपादन विख्यात आहार तज्ज्ञ प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. ते गारगोटी येथे आयोजित अरूण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘अनमोल ठेवा आरोग्याचा, अमूल्य सल्ला डॉ. दीक्षितांचा’ या कार्यक्रमात बोलत होते.

या वेळी अरुण डोंगळे यांच्या हस्ते डॉ.  दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे, गोकुळ संचालक अरुण डोंगळे, धैर्यशील देसाई, विलास कांबळे, सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच सचिन देसाई, शामराव देसाई, पो. नि. उदय डुबल, विजयराव घोलपे, दिनकर कांबळे, दौलतराव जाधव, डी.डी.पाटील, मुकुंद पाटील, नेताजी आरडे, शशिकांत गुजर, सरपंच राजेंद्र चौगुले उपस्थित होते. दत्तात्रय पाटील यांनी स्वागत, तर भैया डोंगळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे