सिनेमा #Me Too वर अन् न्यायाधीश बनले संस्कारी (?) बाबू !

मुंबई (प्रतिनिधी)  : मागील वर्षी सुरू झालेले #Me Too मोहिमेचे वादळ  अद्यापही शमलेले नही. #Me Too मोहिमेंंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. या #Me Too वादळावर लवकरच सिनेमा चित्रित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे #Me Too मोहिमेंतर्गत अनेक आरोप झालेले ज्येष्ठ अभिनेते, संस्कारी बाबू (?) आलोकनाथ सिनेमात न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

लेखिका विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले होते. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने आलोकनाथ यांच्या विरोधात तब्बल सहा महिने असहयोगाचे आदेश दिले. याचा अर्थ, सहा महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही कलाकाराने आलोकनाथ यांच्यासोबत काम न करण्याचे सक्त आदेश दिले होते. #Me Too मोहिमेखाली तयार होणाऱ्या सिनेमाचे दिग्दर्शन नासिर खान करणार आहेत. विनता यांच्यावर १९ वर्षांपूर्वी अलोकनाथ यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप दाखल झाले होते. त्या वेळेस विनता आणि आलोकनाथ सिनेमात एकत्र काम करत होते. पण तेव्हा आलोकनाथांनी त्यांच्यावर लागलेले आरोप फेटाळून लावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे