‘माझी शाळा समृद्ध शाळा’ अभियानात लिंगनूर,हिडदुग्गी शाळेचे यश…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतर्फे जे.पी.नाईक ‘माझी शाळा समृद्ध शाळा’ अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले होते. यामध्ये उच्च प्राथमिक आणि प्राथमिक असे दोन गटात हे अभियान राबवले होते. उच्च प्राथमिक गटात विद्या मंदिर लिंगनूरने जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर प्राथमिक गटात विद्या मंदिर, हिडदुग्गी यांनी जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावून गडहिंग्लजचे वर्चस्व अभियानात ठेवले. या शाळांचे गडहिंग्लज तालुक्यात कौतुक होत आहे. तर लिंगनूर शाळेमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत विद्यार्थ्यांसह शिक्षक, ग्रामस्थांनी जलोष केला.

जिल्ह्यातील शाळांचा सर्वांगीण दर्जा सुधारावा म्हणून जि.प.ने जे.पी.नाईक ‘माझी शाळा समृद्ध शाळा’ अभियान दोन गटांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात राबविले होते. ३०० गुणांचे परिपत्रक तयार करून शाळास्तर, तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर  दोन समित्या नेमून मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये दोन्ही गटातून सहा शाळा निवडण्यात आल्या.  निवड झालेल्या शाळांचे मूल्यमापन करण्यात आले.

यामध्ये उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक विद्या मंदिर लिंगनुर (ता. गडहिंग्लज), द्वितीय विद्या मंदिर, मळगे खुर्द (ता.कागल), तृतीय क्रमांक शंकरलिंग विद्या मंदिर, मडीलगे (ता.आजरा) ही आहेत. तर प्राथमिक गटात प्रथम विद्या मंदिर, भैरीवाड़ी सावर्डे (ता. कागल), द्वितीय विद्या मंदिर, हिडदुग्गी (ता.गडहिंग्लज), तृतीय  विद्या मंदिर, भूमकरवाडी (ता.भुदरगड) यांनी नंबर पटकावले.

हे अभियान जि.प. अध्यक्षा शौमिक महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी राबविले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे