कोल्हापुरात स्टुडिओ उभारण्याचा मानस : भरत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरचा अनेक वर्षांपासून कलानगरी असा लौकिक आहे. त्यामुळे  कोल्हापूरच्या स्थानिक कलाकारांना अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कोल्हापुरात स्टुडिओ उभारण्याचा मानस आहे. यासठी जागेचा शोध सुरु आहे, असे प्रतिपादन अभिनेते भरत जाधव यांनी केले. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे आज (शुक्रवार) ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ भरत जाधव यांना ज्येष्ठ नेते व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी भरत जाधव म्हणाले, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी स्टुडिओ संदर्भात बोलणे झाले आहे. यावर चंद्रकांतदादा यांनी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच या स्टुडिओमध्ये एखादे थिएटर उभे करुन नवीन कलाकारांना जुने सिनेमांची माहिती मिळवी असा मानस असल्याचे सांगितले. हा स्टुडिओची स्थापना झाली तर कोल्हापूरच्या कलानगरीला गतवैभव प्राप्त होईल, असंही जाधव म्हणाले.

यावेळी जयश्री दानवे, राजशेखर दानवे, व्ही.बी.पाटील, सुजय पाटील  आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे