कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील एकही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. सर्व पात्र लाभार्थीना विविध योजनाचा लाभ मिळवा यासाठी सतत प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आ. ऋतुराज पाटील यांनी दिली. ते महिलांना संजय गांधी आणि श्रावणबाळ पेन्शन योजनेनेच्या मंजुरी पत्रांचे वाटपावेळी बोलत होते.

विधवा, परितक्त्या, मूकबधिर, कर्णबधिर, अपंग अशा लोकांसाठी राज्यशासनाने श्रावणबाळ आणि संजय गांधी योजनेच्या माध्यमातून पेन्शन योजना सुरू केलीय. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दक्षिण मतदारसंघातील ३६ गावांमधील जवळपास २१५ महिलांना पालकमंत्री सतेज पाटील, ऋतुराज पाटील याच्या प्रयत्नातून पेन्शन मंजूरीचा लाभ मिळवून दिला आहे.

आ.ऋतुराज पाटील म्हणाले की, निवडणुकीपूर्वी निराधार नागरिकांच्या पेन्शन योजनेचा प्रश्न हाती घेतला होता. गेल्या वर्षभरामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेतंर्गत मिळणारी पेन्शनपासून कोणीही वंचित राहू नये. यासाठी संजय गांधी निराधार योजना समितीची स्थापना करून समितीच्या माध्यमातून काम सुरु केले. आत्तापर्यंत १२०० हून अधिक महिला संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगितले.

यावेळी करवीर पं.स.चे माजी सभापती प्रदीप झांबरे, ग्रामीण  जनसंपर्क प्रमुख बजरंग रणदिवे, सतीश कांबळे, शिवाजी राजगिरे, संगीता चक्रे, संगीता पाटील,  सुनिल पवार आदी उपस्थित होते.