संगीता पाटील यांना ‘आदर्श अंगणवाडी’ सेविका पुरस्कार… 

गारगोटी (प्रतिनिधी) :  गलगले (ता. कागल)  अंगणवाडी सेविका संगिता   पाटील   यांना जि.प. च्या वतीने देण्यात येणारा  आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जि.प. महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदुम, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ,  जि.प. सदस्य राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

गलगले येथील अंगणवाडी सेविका संगीता पाटील  यांनी अंगणवाडीतील मुलांना आकार ज्ञान, बाहुली घर,  अंगणवाडीमध्ये मुलांची शंभर टक्के उपस्थिती, एकही  पाल्य कुपोषित नसणे, प्रवेश उत्सव कार्यक्रमातंर्गत शंभर टक्के मुलांना प्रवेश, इंग्रजी माध्यमांच्या धर्तीवर इंग्रजी शिक्षण असे विविध उपक्रम राबविलेले आहेत.

यावेळी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, जि.प. सदस्या पद्माराणी पाटील, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस,पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे