साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वर्धापनदिनानिमित्त बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करून संजय गांधी निराधार कमिटीवर निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष राष्ट्रवादी सेल जिल्हाध्यक्ष रामराव इंगळे यांनी, गेली अनेक वर्षे गगनबावडा तालुक्यात एकनिष्ठपणे पक्षासाठी काम करणाऱ्या गगनबावडाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांना पक्षाकडून येत्या काळात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगली संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष अमोल कुंभार यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. मधुकर जांभळे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गगनबावडा तालुका राष्ट्रवादीकडून सत्कार करण्यात आला. तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आगामी पं. स. व जि.प. निवडणूक ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, विजय पाटील, पंडित कळके, करवीर उपाध्यक्ष युवराज पाटील, आनंदा जाधव (बालिंगा) सोनाजी पाटील उपस्थित होते.

संजय गांधी निराधार कमिटीवर निवड झाल्याबद्दल बाळकृष्ण गावकर व संजय पोतदार यांचा सत्कार तालुका उपाध्यक्ष भिवाजी वरेकर व राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विवेकानंद सणगर यांच्या हस्ते, तर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष सायरा जमादार यांचा सत्कार करण्यात आला. शेनवडेचे सखाराम कांबळे, उपसरपंच हिंदुराव जाधव, डॉ. आनंदा वापिलकर, डॉ. युवराज पाटील, दिनेश चौकेकर, साजिद जमादार, श्रीकांत पाटील, सुहास गायकर, शरद पवार, अनिल लटके, किरण खेतल, विश्वास म्हेतर,  हर्षद गुरव, दिगंबर म्हाळुंगेकर, ओंकार हेतकर आदी उपस्थित होते.