कुंभोज (वार्ताहर) : हातकणंगले येथील रोटरी क्लब सेन्ट्रलतर्फे आजपर्यंत अनेक सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. महापूर, कोरोना, दुष्काळी परिस्थिती आदी काळात रोटरी कल्बने केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार हातकणंगल्याचे नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांनी काढले.

हातकणंगले येथे रोटरी क्लब ऑफ सेन्ट्रलतर्फे अरुण भंडारे व मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी जानवेकर बोलत होते. उपनगराध्यक्ष केतन कांबळे, रोटरी अध्यक्ष तानाजी चोपडे, सेक्रेटरी धनाजी शेवाळे, सुरेश कोळी, मयूर कोळी, अतुल मंडपे, संभाजी पाटील, मिलिंद प्रभू, ऋषीकेश मुसाई, सदाशिव भेंडवडे, वसंत हापटे, प्रवीण पारसिया, राहुल चिनगे, स्मिता निपाने, रोटरी सदस्य, नगरसेवक व बाळासो कोळी, चंद्रकांत जाधव महेश पाटोळे उपस्थित होते.